कधी तू...
कधी तू...
कधी तू धरेवरील अवखळ वारा
अन् मी तुझ्या प्रीतीचा मंजूळ झरा...
कधी तू पावसाच्या रिझझिम धारा
अन् मी तुझ्या ह्रदयातील अप्सरा.....
कधी तू धवल चांदोबा नभातील
अन् मी तुझी चांदणी काळजातील....
कधी तू खोल खोल सुगंधीत श्वास
अन् मी तुझा निरंतर आहे विश्वास....
कधी तू अती अबोल माझ्या भावना
अन् मी तुझ्या सदैव सचेतन संवेदना...

