कधी थांबलं होत सार जग...
कधी थांबलं होत सार जग...
कधी थांबलं होत सार जग तर तेव्हा थांबली होती गर्दी सारी...
कुणाचा दोन घासा साठी तर कुणाची जगण्यासाठी आर्जवे सुरू होती
कुणी थांबला होता एका ठिकाणी तर कुणी निघाला होता पायी
इथे प्रत्येक माणसाच्या पावलांना फक्त घरी जाण्याची होती घाई...
कधी तरी त्या रस्त्याला ही कुणी विचारत नव्हत
तेव्हा चार भिंतीच्या चौकोनात मी सुखरूप होतो
जेव्हा खिडकीचा आडोसा मला आधार देत होता
त्याचवेळी माझाच माझ्या माणसांशी संवाद होत होता...
सुरू होता काही महिन्यांचा प्रवास पण बदलून गेलं होत आता सार काही
जिथे दुरावली होती माणसे माणसाशी
आता त्या गर्दीची मला भीतीच वाटत नाही म्हणून का
मी हरवत चाललोय आता कसलाही विचार मनात येत नाही...
तेव्हा होती जाणीव आपल्या माणसांची
जबाबदारीने वागत होतो प्रत्येकाच्या सुखासाठी
आता सार विसरूनही गेलो ना कसली चिंता ना कसली काळजी...
बंदिस्त या चौकोनातून कधीच बाहेर पडलो होतो मी
बाहेर पडताना आता साधा प्रश्न ही पडत नाही
होऊन गेलेले सारे कधी पुन्हा परतून येईल...
वाटत सार संपलं तर भीती मनात कसली राहील
पणं अंत ही आरंभ आहे हे कुणालाच कळतं नाही....
