ती...
ती...
कोरच राहिलं होत
माझ्या आयुष्याचं पान
आणि
शेवटी ती सुचली
त्या कवितेसारखी
आणि काय
मांडत गेलो शब्दा
शब्दात तिला
कारण ती माझ्या
भावनेत रुजली होती
लिहिता लिहिता
मनाच्या कोपऱ्यातला
एक एक शब्द लिहीत होतो
आणि कळत होता
माझ्या आयुष्यात
तिच्या असण्याचा अर्थ
कधी कधी ना
तिला आठवताना
नकळत खुलत होती
माझ्या गालावरची खळी
कधी कधी पापण्या ही
ओल्या होत होत्या
मनातलं सारं
उतरत होत कागदावर
आणि एक होत होत्या
दोघांच्याही भावना
गुंतत होतो
सावरत होतो
नकळत घडत होत
स्पर्शाने सार
उलगडत होत
लिहिता लिहिता
सुटत होत एक
वेगळं कोड
कारण
ती कवितेसारखी
सुचत होती
आणि मी भावनेतून
उमटत होतो...

