जमेल का तुला...
जमेल का तुला...
1 min
11.5K
ऐक ना जमेल का तुला
पुन्हा मागे वळून बघायला
असं मनात असताना
ही दूर राहून
आठवणीत जगल्यापेक्षा
थोड आवडेल का तुला
जवळ यायला...
कधी मनाचं ऐकूनच
पावलांनी दूर जायचे
ठरवले होते..
पण समजून घेशील का
त्या पावलांच्या ओढीला...
माहित आहे...
दुरव्याने प्रेम वाढत
पण तरी हुरहूर असतेच ना
बघ कधी जमलच तर
भेट...पुन्हा एकदा
आठवणीत हरवलेल्या
त्या एकट्या
असलेल्या प्राजक्ताला...
