STORYMIRROR

अक्षय काळमेघ

Others

3  

अक्षय काळमेघ

Others

बंदिस्त....

बंदिस्त....

1 min
56

मी खिडकीतून डोकावून पाहत होतो

सुन्या सुन्या दिसणाऱ्या जगाला

मनातल्या मनात माझा जीव गुदमरत होता

त्या चार भिंतीच्या चौकोनात...

मला ओलांडायचा होता तो उंबरठा

मला हवं होत माझं मोकळं आभाळ

आणि मी उंबरठ्याकडे बघत होतो

बघता बघता 

त्या क्षणीच माझं तिच्या कडे लक्ष गेलं

आणि माझी नजर झुकली...

होते नव्हते सारे विचार पुसल्या गेले

तिचा हात हाती घेतल्यावर

आणि श्वास मोकळा झाला

त्या मोकळ्या होत गेलेल्या श्वासातच

मी तिला प्रश्न केला...

तुला कधी या चार भिंतीत बंदिस्त 

नाही वाटलं का...?

ती हसतच म्हणाली

अरे बाहेरच जग हे अनोळखी

पण ह्याच चार भिंती आपलेपणाच्या 

वाटतात...

आणि नात्यांच्या सोबतीने 

आपलेपणाच्या जगात

जग छोट जरी पण मोकळं असतं

बंदिस्त नाही....

आणि तिच्या या दोन 

शब्दांत नकोस झालेलं 

माझं जग मोकळं झालं...

आणि मला माझं आभाळ मिळालं

मुक्त विहरण्यासाठी...


Rate this content
Log in