मला मनासारखं जगायचं आहे
मला मनासारखं जगायचं आहे
1 min
405
एक हाक देऊन जरा वाटेत चालतांना
त्या वाटेलाच आपलसं करायच आहे...
मला मनासारखं जगायचं आहे...
अधांतरी कुठे तरी विहंग होताना
त्या आभाळाला ही कवेत घ्यायचं आहे...
मला मनासारखं जगायचं आहे...
विचारात जाऊन जरा शब्दांना भेटून
त्या भावनांशी जुळवून घ्यायचं आहे
मला मनासारखं जगायचं आहे...
ओल्या पापण्यांना पुसून जरा हसताना
थोडं सुखाला ही बघायचं आहे
मला मनासारखं जगायचं आहे...
थोडं ऊन थोडी सावली होऊन
या दाट धुक्यात हरवायचं आहे
मला मनासारखं जगायचं आहे...
