आयुष्य जगावंच लागत ना....?
आयुष्य जगावंच लागत ना....?
मनात चाललेल्या विचारातच अनेक प्रश्न समोर येऊन उभे असताना
त्या उत्तराच्या शोधात राहावं लागतंच
शोध...शोधलं की सापडतपण काही गवसल नाही तर?
निराश होऊन माघार घ्यावी लागेलती घेईल पण...
अनेक चेहऱ्यांना सामोरं जावं लागेल सामोरं जाईलही...
पण अनेक शब्दांचे टीकास्त्र सोडले जातील ती झेलण्याची हिम्मत राहील का?
राहील ही... पण निराशेच्या जगात जगण्याची आस राहील का?
राहील ही... पण पुन्हा जिद्दीने प्रयत्न करता येईल का?
करेल ही... पण नव्याने पुन्हा एकदा शोधेलही पण यात माझ्या विचारांचं काय?
प्रत्येकवेळी दुसऱ्यांच्या विचारातच आयुष्य जगावं का?
की आपल्याही मनाप्रमाणे जगायला मिळेल का?
इतक्याच प्रश्नावर येऊन आयुष्य थांबत ना...
हल्ली आपण सगळच शोधतो पण स्वतःला कधी शोधतो का?
नाही ना... आणि शोधलं तरी... मनासारखं जगायला मिळत का?
मिळेल नाही मिळेल... माहीत नाही पण इतकं असूनही शेवटी
प्रश्न मात्र राहतोच की आयुष्य जगावंच लागतं ना...?
