काय पाहिलंस माझ्यात
काय पाहिलंस माझ्यात
एक सरसरती नजरानजर झाली
नकळत काळजात कालवाकालव झाली
नजरेचाच मागोवा तुझ्या राजबिंड रूपाचा
ओझरती नजर कशी दिलफेक अदा झाली
रोखठोकपणे बोलणे माझे
कधी तुझ्या हृदयात रुतले
घायाळ काळीज रक्तबंबाळ
जखमांनी तुझेच वेध घेतले
जगणे मरणे एकजीव झाले
तुझ्याविना काहीच करमेनासे झाले
मी उभी साठवली मनात तुझ्या
असे माझ्यात तू काय पाहिलेस
साधीसुधी मी भोळीभाबडी
व्यवहारीकतेचा क्लेशमात्र नाही
चतुरतेचा , हुशारीचा नाही गवगवा
जिद्दीहट्टीची चंद्रप्रभा नाही
खट्याळ नाती अवतीभवती
खोट्या दांभिकतेचा मागमूस नाही
चांदणे पडती गालात तुझ्या
प्रमाणिकतेचा दरबार नाही
जगणे तुझ्याविना हद्दपार
तूच माझे जीवन गाणे
सदा गुणगुणत राहावे
बेधुंद होऊन साजने
नालंदा वानखेडे,
नागपूर

