काय म्हणू
काय म्हणू
का मला देतेस
तू अशा डागण्या
काय म्हणू मी आता
तुझ्या अशा मागण्या || 0 ||
मन तुझं समाधानी
कधीच का होत नाही
सदा तू अतृप्तच
कितीही केल्या काही
कंटाळलो आहे मी
तुझ्या अशा वागण्या
काय म्हणू मी आता
तुझ्या अशा मागण्या || 1 ||

