STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Tragedy

3  

Ashok Shivram Veer

Tragedy

काय लिहू कशावर लिहू...

काय लिहू कशावर लिहू...

1 min
191

लिहू कशावर आठवत नाही, 

की बोलू कशावर समजत नाही.

बोललेले समजत नाही, 

की लिहीलेले कळत नाही. 

काहीही झाले तरी काहीच सुचत नाही.


शोधतो शब्द अन करतो आहे विचार, 

पण मनाला पटत नाही कोणताच आचार. 

वाटते कशाला हवेत असे विकार,

अन सोडून द्यावेत सारेच प्रकार.


सापडण्यासाठी असावे लागते, 

लिहिण्यासाठी आठवावे लागते.

अन समजण्यासाठी भानावर असावे लागते.


लिहू कशावर आठवत नाही, 

की बोलू कशावर समजत नाही.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy