काय करावे ह्या प्रेमाचे
काय करावे ह्या प्रेमाचे
सोडूनी तुजला जाते मी येथुनी
परी माझं मन आहे तुजपाशी
प्रेमाच्या गाठी का अशा बांधल्या जातात
खरंच काय करावे ह्या प्रेमाचे
मला अजूनही कळत नाही
काम करते पण ध्यानी तूच असतो
जाते रस्त्यातूनी पण वाटेत तूच असतो
खरंच काय करावे ह्या प्रेमाचे
मला अजूनही कळत नाही
मन लागत नाही पण मन लावते
कितीही सुटायचा ठरवला तरी मनी तूच असतो
खरंच काय करावे ह्या प्रेमाचे
मला अजूनही कळत नाही
वाटते मनी आता तुझ्याजवळ यावे
वाटते मनी तुझ्या मिठीत यावे
खरंच काय करावे ह्या प्रेमाचे
मला अजूनही कळत नाही

