काटे
काटे
हृदयात घेत काटे जपतो फुलास आहे
मजला तसा फुलांचा भलताच त्रास आहे
कळले कुणास नाही मन घालमेल होते
छळती मला सुखांचे नुसतेच भास आहे
गगनात चांदण्यांचे फुलले किती नजारे
गलक्यात गीत माझे भलते उदास आहे
भवनात भोजनाच्या सजली सुगंधी ताटे
कळले कसे तयांना मजला उपास आहे
हळुवार पावसाने हलकाच वार केला
हसवून मारण्याची तलवार खास आहे
