कातरवेळ
कातरवेळ
जाणार होतास तू ,तर थांबवलेस मला कशा साठी?
प्रेम आपलं टिकून राहील ,मी आहे ना मग भीती कशाची?
खूप काही वचन आणि शब्द ,भुलवले होते तू मला,
तुझ्या करड्या डोळयात गुंतून घेतले होते स्व:ताला
तुटणार नाही ग हे बंध,का कमकुवत समजतेस या प्रेमाला?
इतकं गोड बोलणारा,झटकन म्हणालास,
नाही राहू शकत एकत्र आपण,
ओझं झालंय ग या बंधनाच
सगळा भार माझ्या वर टाकून तू मोकळा झालास रे.
मी मात्र अजून ही कैद आहे तुझ्यात,तुझ्या शब्दात
सांग मला कसे मोकळे करशील?
माझा ही जीव गुदमरतो,श्वास ही अडकतो,
कातरवेळ ही असह्य होते,जुने व्रण पुन्हा पुन्हा उकलते
किती सोपं असत ना रे तोडून टाकण,बघ जमलं
तर मला ही ...
कारण खंडित तर मी ही झालेय,बस्स तुटण बाकी आहे.
या कातरवेळी तुझी याद ,नाही तू जवळ असणं बाकी आहे.
समाप्त।

