STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Romance

1  

Abasaheb Mhaske

Romance

कारणं मी तुझ्यावर प्रेम केलंय.

कारणं मी तुझ्यावर प्रेम केलंय.

1 min
3.2K


तुझं हसणं- रुसणं , असणं - नसणं  

न थकता मी सहन करीत आलोय ...

तुझ्यासाठी काहीही करण्यास तयार 

कारणं मी तुझ्यावर प्रेम केलंय..

प्रत्येकवेळी मीच का ...

समजून घ्यायचं खूपदा वाटलं 

दरवेळी मनालाच समजावलं 

प्रेम करणं इतकं सोपं असत का ?

प्रेम हे दोन्हीकडून असावं लागत 

तेव्हाच ते टिकत , बहरत ...

हे तर मला केव्हाच समजलं पण 

तुला ना कधी कळलं ना कळेल असं वाटतं ..

प्रेम करणं सोप्प असत ,ना ते निभावणं ...

प्रेम जडलं कुणावर तर ते अढळ असत ...

एकमेकांना समजून घ्यावं लागत...

प्रेम आपुलकी , विश्वासानं वृद्धिंगत होत 

तू दिलेल्या वेदनांनाही स्वीकारलं ...

तू मात्र प्रत्येकवेळी सॉरी म्हणून मोकळी ...

मी पुन्हा गाफील तुझ्या चुकांवर पांघरून घातलं 

तिथेच माझं खरं चुकलं .. असं आता वाटतं...

तू गृहीत धरलंस सदा नि कदा मला

मी मात्र तुझ्या भावना जपत आलोय ...

मी दुर्लीक्षित केलं तुझं हेकेखोर वागणं ... 

कारणं मी तुझ्यावर प्रेम केलंय...  

 

तुझे सुख स्वप्ने तुला लखलाभ 

माझे दुःखही तुला कधी न दिले 

तू दिलेल्या अश्रूंचीही झाली फुले...

कारणं मी तुझ्यावर प्रेम केलंय...  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance