कारखान्याचा धूर
कारखान्याचा धूर
कारखान्याच्या धुराने
प्रदूषित झाली सृष्टी
मानवा सोबत नदी नाले
जंगलेही दिसू लागले कष्टी
चिमणीच्या धुराने
दम्याचा त्रास वाढू लागला
कामगार बिचारा तरुणपणीच
खंगुन जाऊ लागला---
यंत्राच्या त्या आवाजाने
त्याला बहिरेपण आले
जीवनाचे सुर त्यांच्या
बेसूर सारे झाले
निद्रानाश,चिडचिडेपणा त्यांच्या
पाचवीला पुजलेला आहे
कृश शरीर त्याचे व्याधिंचे
माहेरघर झाले आहे
प्रदूषणाने ह्या
झाडे वेली कोमेजून गेली
शुद्ध अशी हवा ही त्याला
मिळेनाशी झाली
कारखाने हे शहरापासून
असावेत खूप दूर
उंच आकाशी सोडावा
चिमणीचा तो धूर
प्रदूषण थोडेफार
होईल त्याने कमी
कामगारांना मिळेल
जीवनाची हमी
