कारगिल
कारगिल


जय वीर जवान
देशासाठी दिले प्राण!
देश अमुचा हिंदुस्थान
जगात झाला हो बलवान!
रात्रंदिनही दरी-कपारी
शत्रूंचाही केला फज्जा!
एक-एक सर काबीज केले
देशाची की हो राखली शान!
माता-पिता-पुत्र-पत्नी!
न-तमा हो केली त्यांची तुम्ही!
रक्ताच्या एक-एक थेंबातून
केले की हो नवनिर्माण!