कामगार गीत- संजय र.सोनवणे
कामगार गीत- संजय र.सोनवणे
संकटकाळात दोन वेळची भाकरी आम्हां मिळावी
जगण्यासाठी आता आम्हांला नोकरी मिळावी
हातावरच्या माणसाची हाक तुम्ही ऐकावी
असंघटीत कामगारांची दैना तुम्ही पहावी
अन्न,वस्र आणि निवारा याची सोय व्हावी
महाराष्ट्रात ही समस्या कधी कुणास न यावी
शिक्षण,आरोग्य आमच्या लेकरांस मोफत मिळावे
महाराष्ट्रासाठी,देशासाठी कष्ट करण्यास काम द्यावे
शिक्षण घेत असतांना भाकरीची चिंता मिटावी
शिक्षणातूनच नोकरीची पक्की हमी मिळावी
जिल्हापरिषद,पंचायतीची नोकरी स्पर्धापरीक्षेतून व्हावी
गरीब आपले गाव सोडून कधी जाणार नाही परदेशी
खरा गरीब गावात जगेल न्याय मिळेल शासन दारी
कामगारदिनी संजय सोनवणे गातो गीत कामगारांचे शासन दरबारी
कामगारांची व्यथा अवघड ,जीव बेवारस वार्यावर
नाही कुणाचे सहाय्य त्यांना द्या आधार मायबाप सरकार
नको संप,नको हरताळ सहाय्य करू शासनाला
तुम्हीच मायबाप सारे गरीबांचे भाकर द्या पोटाला
कामगार दिन व्हावा गरीबांची एक सार्थक आठवण
त्या दिवसाचे औचित्य साधून करावे गरीबीचे निर्मूलन
गरीबांनो लक्ष देऊन ऐका,करा लोकसंख्येचे नियंत्रण
तेव्हाच उद्दिष्ट साधेल महाराष्ट्राचे तुमच्या विचारधारेन
उगाच कुणाला नावे ठेवून उपयोग होणार नाही
शपथ घेऊ या छोट्या कुटूंबाची, वाया जाणार नाही
