काहूर
काहूर


बंड असेही काही
निरर्थक त्यांनी केले
अर्थहीन सारे तरी
उगाच काहूर केले
निर्दोष जरी मी होते
तरी उगाच मीही भ्याले
नको न्याय निवाडा
भावनेस कुंपण केले
पाय ओढण्यात माझे
पटाईत ते साले
सुख माझे बघवेना
जळून तेही मेले
भीती मनात होती
असे काय झाले
नसताना भोग माझ्या
वाट्यास का हे आले
बघतील चार नजरा
दोन वाईट, दोन बऱ्या
लादलेल्या गुन्ह्याचा
समजेना अर्थ खरा