STORYMIRROR

Swati Tondrod

Inspirational

3  

Swati Tondrod

Inspirational

कागदाचं विमान उडतंय भुर...

कागदाचं विमान उडतंय भुर...

1 min
12.1K

अथांग या आकाशात

उडायचंय मला

कागदाच्या विमानासारखं

सहर करायचंय मला


उडत्या पक्षांच्या मागे

शिवाशिवी खेळायचंय मला

निळ्याभोर आकाशाचा 

रंग निरखायचंय मला


पंख पसरुन हा गगन

पंखात सामावुन घ्यायचंय मला

दिर्घ श्वास घेऊन 

मनातील भावना व्यक्त करायचंय मला


खरचं ही स्वारी 

स्वप्नातचं का होईना 

अनुभवायचंय मला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational