का?
का?
भंगलेल्या मनोरथातुन साद उगा का येती?
खुडते कोणी फूले हळू हळू गंध नको ते देती.
रात्रीचा अंधार रेशमी हातातुनी निसटे
कोनाड्यात ज्योत तड्फडे कोण तिला ग दिसते?
मनातल्या बेभान कण्यातून कोण उसासे भरतो?
उगाच कोणी रात्र विझवतो, उगाच दिन पेटवतो.
मर्म सांडल्या पडिक घराला चंद्राचा का थारा?
कोपर्यातल्या देवघराला अजून जपतो वारा?
पाचोळ्यावरी नभ ओथंबूनी जीवन मंत्र वाचे
माळ पठारी बीज अंकूरे काय पुढे हो त्याचे?
अर्थ नसे का उरला काही देह, व्योम, सृष्टीला?
पापणीत ये स्वप्नांचा पूर, तेज नसे दृष्टीला.
