बाळाचा पाळणा
बाळाचा पाळणा
1 min
29K
अंगणी पाळणा पाळणा,
चंदनी देखणा.
अंगणी पाळणा पाळणा.
वारा वाहतो ग वाहतो ग,
पाळणा झुलवितो.
वारा वाहतो ग वाहतो ग.
उडती परिमळ ग परिमळ ग,
भुईला दरवळ ग.
उडती परिमळ ग परिमळ ग.
सुर्व्या लपतो ग लपतो ग,
मेघा आडुन बघतो.
सुर्व्या लपतो ग लपतो ग.
अंबर वाकले वाकले,
कृष्ण मेघ सावळे.
अंबर वाकले वाकले.
ओढा मंजुळ ग मंजुळ ग,
गाणी गुणगुणतो ग.
ओढा मंजुळ ग मंजुळ ग.
झाडे सळसळती सळसळती,
नाचात रंगती.
झाडे सळसळती सळसळती.
पाने लवलवती लवलवती,
टाळ्या वाजविती.
पाने लवलवती लवलवती.
सारे बघती ग बघती ग,
गोविंदा खेळतो.
सारे बघती ग बघती ग.
मोहन हासतो हासतो,
मदना सम भासतो.
मोहन हासतो हासतो.
आई हरकून हरकून,
बघे लिला दंगून.
आई हरकून हरकून.
अवघा आनंदू आनंदू,
भेटला गोविंदू.
अवघा आनंदू आनंदू.
