STORYMIRROR

Nikhil Ghag

Inspirational

2  

Nikhil Ghag

Inspirational

आठवणी

आठवणी

1 min
3.1K


सावली लांबता

अंधाराला साद

नक्षत्राचे रान

करेलका नाद ?

रूणझूण पक्षी

येई बारी वर

हात त्याला देता

उडे परावर

थंडीतले उन

पहाटेच्या वेळी

हळूहळू मग

अंग कसे पोळी

वणव्या सोबत

पावसाच्या सरी

पावलांचे ठसे

पचोळ्याच्या वरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational