STORYMIRROR

Nikhil Ghag

Others

2  

Nikhil Ghag

Others

नाती

नाती

1 min
2.8K


दूर लांब दिली ना हाक, कुजबुजलो  हळूच कानी.

पारध्यास माझ्या धाडा, हत्येचा निरोप कोणी.

वेलींना वास उन्हाचा, पार्‍याचे उंच मनोरे.

पेरा पेरा वर सोलुनी, बांधावे रेशीम दोरे?

कोर्‍या  देहाच्या भवती, वेटोळे मऊ पिसांचे.

शहारून ज्योत विझावी, गाऊन गीत दिव्यांचे.

येऊन श्वास गहिवरले, देहाच्या उंबरठयावर.

दचकून जसा थांबावा, नवा साधू गंगानाते तीरावर. 


Rate this content
Log in