STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Others

का तर मी मुलगी आहे

का तर मी मुलगी आहे

1 min
302

खूप, खूप हसावं वाटते

लगेचं वाटते

कोणी पाहिलं

पाहिलं, तर काय

म्हणेल????

का तर???

मी मुलगी आहे


आई म्हणते

मुलीनं जोरानं

हसणं बरं नव्हे

का तर?

मी मुलगी आहे!!!!

गडी माणसांसमोर

येऊ नये

मस्ती करू नये

लवून, चोपून राहावे

कोणत्याही मुलाशी

बोलू नये?

का तर मी मुलगी आहे


हे करू नको?

ते करू नको ??

ते कपडे घालू नको?

हे कपडे घालू?

हे नको ते नको???

प्रत्येक जागी????

प्रश्न???

का तर मी मुलगी आहे...!


का तर मुलगी असणं

गुन्हा आहे????

मनासारखं, राहू

शकत नाही?

मनाप्रमाणे जगू शकत नाही?

का तर मी मुलगी आहे????


कधी कधी वाटतं देवानं मला??

बनवलं असेल

खरंच सांगा मुलगी इतकी वाईट असते का?

कोणी पोटात मारतं

तर कोणी जन्माला आल्यावर

कोणी बार बार मारतं

का तर मी

मी मुलगी आहे????

हमेशा मलाच सहन करावं लागतं!!!

का तर मी मुलगी????

Prabhwati sandeep wadwale nandedkr


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy