का इथे
का इथे


का रितीरिवाजांचा जाच इथे
का रस्त्यावर टोचणारे काच इथे
का माणसाला माणसाचा त्रास इथे
का मनाला बोचणारे इतके भास इथे
का दुसऱ्याच्या स्वप्नात
माझ्या आक्षेप इथे
का कुण्या तिसऱ्याचा
जीवनात हस्तक्षेप इथे
का होताना वेदना सारेच
बसलेले आज मुक इथे
का नाही शमलेली आज
विषयांची भूक इथे
का भरदुपारी आकाशात
आज काळोख दाटलेला इथे
का भरविताना इतरांना
खिसा माझा फाटलेला इथे