का दूर मी एकटी
का दूर मी एकटी
का मी दूर एकटी
असते कधी कधी
गूंत्यात आठवणीच्या
अडकते कधी कधी
काळयाशार नदीच्या डोही
शांततेत रमत असते
दगड फेकता उठती तरंग
जल असे निखळ थरथरते
एकांत मला हवासा
आठवणीचा उगाच पिंगा
विश्वासाच्या तूझ्या प्रतिमेत
मन सतत घालते रिंगा
नकोच मला आता तूझ्या
प्रकट स्मारकांची दळे
भूतकाळ गेला इतका तरी
का मनी तूझीच देवळे
जा निघून तू मनातून
कर जीव हलका जरासा
घेऊ दे या जीवनी
शांततेचा एक उसासा
नको आता तुझ्यातले हे
ह्या मनाचे हरवलेपण
दुरुन दिसतो ना एकमेकांना
कशाला हवे हव्यासाचे क्षण
