ज्योती / ज्योत
ज्योती / ज्योत
दिवा समई पणती
पहा कसे मिणमिणती
वाऱ्याशी करी सामना
इवलीशी एक ज्योती
स्वतः राहते अंधारात
सर्वांना प्रकाश देती
ईवलासा देह पहा
इतरांचे हित चिंतीती
असा एक क्षण येतो
जिथे विझुनी जातो पूर्णतः
मिणमिण करत होती शांत
त्यातच पाहती आपली धन्यता
घेऊ त्याच्याकडून आपण
गुण तयाचा एक छान
पावलागणिक दाखवू तया
उजेडाची छोटी खाण
वाट दाखवी सर्वांना
देती मदतीचा हात
स्पष्ट उजेड नसे दारी
तरी बने छोटीशी ज्योत
