जवळ आहेस तू सदा
जवळ आहेस तू सदा
जवळ आहेस तू सदा
भाळले पाहून तुझ्या अदा
सोबत रहाण्याचा करूनी वादा
गालगुच्चा घेतोस एखादा
चहाचा कप मागतोस कधी
एखादा घोट पाजतोस कधी
तुझ्या या वागण्याने जडेल
तुझ्या अवखळ प्रेमाची व्याधी
गप्पा भरभरून मारतोस
गप्पात सगळ्यांनाच जोडतोस
कुटुंबाला बांधून ठेवायला
पहिल्या नबंराने झगडतोस
तुझ्या या सुप्त गुणांचा
नेहमी वाटतो मला हेवा
उलगडणाऱ्या आयुष्याचा
वाटे गोड प्रसाद तुला द्यावा

