जरी ते वरचढ झाले
जरी ते वरचढ झाले
जरी ते वरचढ झाले,
मयानातुन तलवार निघाले,
आक्रोश भयाण त्याचा,
खोट्यांचे खरे करून झाले...
हा शांत निशब्ध,
याला जणु शब्द नव्हते,
डोळे घट्ट मिटून घेतले ,
तु बोल ,
मी सारे ऐकले...
आता त्याला हायसे वाटले,
सरीपाटाच्या या खेळात ,
माझेच प्यादे खेळले,
शेवटी मीच चेकमेट केले...
अहो ऐवढी घाई कशाला,
तुम्ही त्याचा का? न्याय पाहीला,
श्रीकृष्ण गीतेत वदला ,
जैसे कर्म तसच फळला ,
मग तु कसा लपला...
ढोल ताशे पिटवुन घे नगारे,
जे सत्य आहे ते तसेच राहणार रे,
सत्याचा असत्यावर विजय होणार रे,
म्हणुनच चांगले कर्म करा रे...
चांगले कर्म करा रे...
