जरासा पुर ओसरायला लागलाय
जरासा पुर ओसरायला लागलाय
आता कुठे जरासा पुर ओसरायला लागलाय,
वाङयात पुन्हा आईच्या बांगड्या जोरात वाजायला लागल्यात,
बाबांची सायकल उन्हातान्हात फिरतांना दिसतेय,
आता कुठे जरासा पुर ओसरायला लागलाय..
पुन्हा एकदा पाठीवर दप्तर दिसायला लागलंय,
शाळेत पाटीवर नव अक्षर उमटायला लागलय
आता कुठे जरासा पुर ओसरायला लागलाय
उशा, पांघरुणं उन्हात वाळायला लागलीत,
म्हातारी खोङ परत वङाखाली जमायला लागलीत,
आता कुठे जरासा..
पावसात भिजलेली माणसं अन कोरङा झालेला पाऊस परतीच्या प्रवासाला निघालीत
एका हातात छत्री, दुसरया हातात वळकटी,
अन ङोळयात अश्रुंची दाटी,
आपले जवान कित्येक मनांचे देश जिंकुन,
आपल्या घराची विचारपुस करायला निघालेत..
आता कुठे जरासा पुर ओसरायला लागलाय
आता कुठे जरासा पुर ओसरायला लागलाय.
