जपून ठेव सारे
जपून ठेव सारे
जपून ठेव सारे तुझ्या माझ्या आठवणीचे पसारे.
दूर असू एकमेकां पासून तेव्हा उलगडत राहू हे धागे.
नव्हतीच एक कधी वाट आपली,का सोबत चालण्याचे,
शोधलेस तू किती सारे बहाने.
खूप मोती साठवून ठेवले तुझ्या ,
माझ्या शब्दांचे आता ही उठतात रे जाणिवांचे शहारे.
किती जपायचं आणि किती टाकायचं,
रीती पूर्ण झाले मी,तरी उरतेच काही बाकी.
प्रश्न आणि प्रश्नच होते कायम,
माहीत असून ही टाळलीस तू त्यांची उत्तरे.
तुकड्या तुकड्यात तुला जोडून ठेवलंय,
शेवटचे कधी पाहिले तुला ,धुसरच दिसत होते सारे.
येशील कधी तू माझ्या जवळ दिसेल मग तुला ही,
तुझ्यात मी सामावलेली जणू कान्हाची मीरा रे.
जपून ठेवीन तुला तुझ्या श्वासाना,
मागत काहीच नाही तुला,फक्त जाणून घे,
मला अन माझ्या मनीचे भाव रे.
तुला जिंकून देण्यासाठी ,
कायम सख्या असेल माझी हार रे.

