STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others Children

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others Children

जन्मदाता

जन्मदाता

1 min
223

जन्मदाता बाप 

मायेचा हा हात, 

जबाबदारीत या 

देई खरी साथ. 


पडे काही कमी 

वेळेत आणूनी,

देई सारे काही 

कधी न बोलुनी. 


प्रेम करण्यास 

कधी नाही मागे,

शिस्त लावण्यास 

कठोरही वागे.


कुटुंब प्रेम हे 

वसे ध्यानी मनी,

कर्तव्य बजावे 

आपले हसूनी.


दिवसभर हा 

कष्टाने तो राबे,

येताच उशिरा 

बाळास गोंजारे. 


दुःखात असता 

कधी न दाखवे,

अश्रूंची ओघळ 

डोळ्यात लपवे.


दूर ज्याचा बाप 

विचारा हो त्याला, 

माया ही बापाची 

आहे कुटुंबाला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational