जन्माची साथ
जन्माची साथ
नको मला ताजमहाल
मी मेल्यावर बांधशिल
नको मला तुझे फुल
तू देऊन ते विसरशील
नको मला मोत्यांचा हार
मला नको गुलाब अत्तर
नको तुझी रेशमी साडी
विनवणी केल्यास सत्तर
रुसली नाही मी सख्या
वाटल्यास कान पकडते
प्रेमाने गोड बोलून मी
मिठीत तुला जकडते
मागते तुला वचन प्रिया
हातात माझ्या हात दे
हिरे मोती काही नको
फक्त जन्मभराची साथ दे

