जन्म मला घेऊ द्या
जन्म मला घेऊ द्या
सांगा, आई-बाबा सांगा,
मी काय केलेय पाप..?
जन्मआधीच मरण्याचा का
मिळालाय मला शाप..?
गर्भात चिरडतांना होते
माझ्या जीवाची लाही लाही..
तुमच्या 'दिव्या'पेक्षा कुठेही
कमी नाही माझी रोषणाई...
आज प्रत्येक क्षेत्रात पुढे
कन्या-पत्नी-बहीण-आई..
मीच तुमची कल्पना, उषा,
किरण, जिजाऊ व सावित्रीमाई...
तुमचे प्रेम आटले म्हणून
संघर्षमय माझ्या जीवनाची वाट..
जन्म मला घेऊ द्या,तरच
उगवेल निश्चित सुखमय पहाट...
मी मायेचा पाझर अन
समता-एकताचा आधार..
माझ्या आगमनाने होईल
तुमच्या साता पिढीचा उद्धार...
हुंड्याचा स्वार्थ ठेवा बाजूला
पैशाला देऊ नका महत्व..
सुखी आयुष्याचे खरे तर
मीच सार आणि सत्व..
आता तरी जागे व्हा
गर्भातून देतेय तुम्हांस साद..
शासनाच्या"लेक वाचवा"
अभियानास द्या उदंड प्रतिसाद..
