जनावरं
जनावरं
सरड्यालाही नवल झाले
झाला तोही दंग
माणूस जेव्हा बदलू लागला
त्याच्यासारखाच रंग
मानवाचा स्वभाव पाहून
कोल्ह्यालाही प्रश्न पडला
माझ्यापेक्षा जास्त धूर्तपणा
याने नेमका कोठून शिकला
सर्प विषारी डंख करी
तो दंश कळे झाला कोठून
मानव विष पेरतो ते
कळेना काढावे कोठून
भूक पोटाची भागवण्या
हिंस्र जनावरे शिकार करती
वासनेची भूक मिटवण्या
माणसे अब्रुचे वाभाडे काढती
माणूस म्हणून जन्माला आला
मग असा बदल तो कसा झाला
माणूस जनावरांसारखा
कसा आज वागू लागला