STORYMIRROR

Ashok Kulkarni

Tragedy Others

3  

Ashok Kulkarni

Tragedy Others

जमिनीला भेगा

जमिनीला भेगा

1 min
195

आटे पाणी विहिरीचे

गाठीते पाताळाचा तळ।

अश्रू ही सुकतात डोळ्यातील

प्यायच्या पाण्यासाठी तळमळ।।


धरती पाणी पाणी करी

पडे तिजला भेगा।

जणू काही पडतात

काळजावरती रेघा।।


तप्त जमीन ,तप्त माती

अन सुकलेले ओठ।

सूर्य ओके ज्वाला 

खपाटीला गेले पोट।।


नसे पाखरांचा चिवचिवाट

सगळीकडे शुकशुकाट।

पाणवठे पडती ओस

उदास झाली पाऊलवाट।।


दावी आभाळ वाकुल्या

जनावरांचे खाली पोट।

गोठे दिसती उदास

अन धुळीने पांघरलेली वाट।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy