जळतात सारे लोक
जळतात सारे लोक
दुःख माझं कुणाला
मी सांगू कशाला,
कोण पुसणार डोळे
लागतील सारे हसायला..
जातील सरुन हे ही
दुःखाचे सारे दिस,
येईल एके दिवशी
सुख माझ्या वाट्याला.
हसून पाहतात सारे
माझ्या रडण्याची मजा,
मी कशाला हसू
त्या रडणाऱ्याला..
जळतात सारे लोक
दुखतात त्यांचे पोट,
लागायचे कशाला
वाईटांच्या नादाला..
