STORYMIRROR

Anil Chandak

Classics

2  

Anil Chandak

Classics

जलधारा बरसता

जलधारा बरसता

1 min
287

टपटप, जलधारांनी,फेर धरला !

वाजत गाजत, घन बरसत आला !!धृ!!  


पाऊस पडता , झाला मनांसी आधार!

धरा हरकुनी, तृप्तीने देई हुंकार !

पावसाची,आस लागलेली धरणीला !!1


पयोधर, बरसता ,वसुंधरेवरी !

गर्जना करीत, सौदामिनी नृत्य करी !

सुटकेने श्वास सोडता, हर्ष सृष्टीला !!2


वृक्ष पानापानांतुनी, पाणी बरसता!

पशुपक्ष्यांना आनंद,मुक्त बागडता !

त्रस्त झाली होती सारी, विसावा मनांला !!3


लहानथोर, फेर धरती,पावसात !

नाचती आनंदे,थेंब अंगावरी घेत !

व्याकुळ मनांचा,जीव होता टांगलेला !!4


वाहती पन्हाळे,रस्त्यावरी धार धरे !

पाण्याचे ओहळ, जनांचा खोळंबा करे !

कागदी होड्या ,सोडुनी आनंद मनांला !!5


नभाकडे डोळे लागले ,शेतकऱ्यांचे !

विनवीती, बरसुनी, दे दान कृपेचे!

जलधारा पाहुनी, हर्ष बळीराजांला !!6


पाऊस पडता, पुर आला आठवांचा !

गालावरी मोती ढळता, जड श्वासांचा!

सखीची ओढ जाणवी, विरही मनांला !!7 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics