STORYMIRROR

pranav kode

Tragedy

4  

pranav kode

Tragedy

जिंकलं कुणीच नाही...

जिंकलं कुणीच नाही...

1 min
356

अचानक उसळलेली गर्दी

एकाच पुलावर शेकडो लोक

एकाच वेळी

आणि एकाच मिनिटाचा तो थरार

सारे काही डोळ्यांच्या समोर घडत होते

अचानक काय सुरू झाला पाऊस

आणि घेतला जीव

बहिणीचा भावाचा बाबांचा

आणि कुणाच्या आईचा

चूक होती का पावसाची?

नेहमीचाच तो

पण भयंकर घाबरवलं त्यावेळी

त्याच्या त्या रौद्र रूपाने

ओरडलं कुणीतरी भीतीने

कोसळला रे पूल

अफवा होती फक्त

आणि भीती आपला जीव गमावण्याची

सगळे धावले जीव मुठीत घेऊन

पण जिंकलं कुणीच नाही

भीतीने भीतीचा बळी घेतला 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy