STORYMIRROR

Ankit Navghare

Tragedy

3  

Ankit Navghare

Tragedy

जिंदगी

जिंदगी

1 min
84

कहाणी जिंदगीची माझ्या 

मी आता सांगु तरी कुणा


होती झोपडी माझी म्हणायचो 

त्याला माझा हा राजवाडा जुना


चाललो मी वाट आयुष्याची अशी

की फक्त उरल्या मागे खाणाखुणा


"शितावरची भुतं" होती लोक इथली

माझ्याविना तो स्मशानही राहिला सुना 


आली ओहोटी तरी कोरडा किनारा 

हो हो त्यालाच आयुष्य ऐसे म्हणा 


वाटते कधी कधी का मी जन्मलो या 

माणसांत काय होता हा माझा गुन्हा


न मला जगणे जमले जन्मी म्हणुन

काय मेल्यावरी जन्म घेऊ मी पुन्हा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy