STORYMIRROR

kusum chaudhary

Inspirational

3  

kusum chaudhary

Inspirational

जीवनवाट

जीवनवाट

1 min
210

जीवनाच्या वाटेवर येती

सुखदुःख अवघड घाट.

संयम धैर्याने हिंमतीने

चालावी गड्या जीवनवाट.


जीवनाच्या वाटेवर गर्व 

नसावा मनी तो अहंकार.

गर्वाचे घर असते खाली

मनी स्मरा तुम्ही वारंवार.


जीवनाच्या वाटेवर रहा

सदोदित तुम्ही अग्रक्रमी.

यश किर्ती सुख समृद्धीने

जीवनात सुखाचीच हमी.


जीवनवाटेवर चालतांना

रहा सत्कर्मासाठी तत्पर.

दीन दु:खितांची सेवा हाच

आहे खरा धर्म खरोखर.


जीवनाच्या वाटेवर करू

तडजोड घेऊन माघार.

सुखी संसाराची गुरूकिल्ली

करू एकमेकांचा आदर.


जीवनाच्या वाटेवर मृत्यू

 हेच अंतिमत: सत्य आहे.

मरूनी किर्तीरूपे उरावे

यशस्वी जीवनसार आहे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational