जीवनातही असेच घडणार
जीवनातही असेच घडणार
ग्रीष्मात पिकली पाने गळणार
वसंतात पुन्हा पालवी फुटणार
जीवनातही असेच घडणार
सुखदुःखाचा खेळ चालणार.
डोळ्यांत कधी अश्रू तरळणार
कधी ओठावर हसूही फुलणार
जीवन हे असेच कळणार
अश्रूंचे ही फुले उमलणार.
पेराल जे तेच उगवणार
नवे अंकुर जोमाने फुटणार
जीवन हे असेच फुलणार
संस्कार जसे त्यावर घडणार.
सूर्य कधी हा आग ओकणार
कधी ढगांच्या मागे लपणार
जीवन हे असेच खुलणार
ऊन सावलीचा खेळ रंगणार.
स्वप्न नवे उराशी बाळगणार
साकरण्या चांदानासम झिजणार
जीवन हे असेच असणार
स्वप्नांचा हा बाजार भासणार.
प्रश्न नवे रोज उभे ठाकणार
कधी सुटणार, कधी न सुटणार
जीवन हे असेच जगणार
जीवन हेच एक कोडे वाटणार..
