STORYMIRROR

Durga Deshmukh

Inspirational

3  

Durga Deshmukh

Inspirational

जीवनाचा आधार

जीवनाचा आधार

1 min
328

वृक्ष आपल्या जीवनाचा आधार 

आहेत धरतीचा ते श्रृंगार 


सगळ्यांना देतात वायु प्राण 

त्याची थोडी असु द्या जाणं 


वृक्ष आहेत ईश्वराचे अनुदान 

पाने फुले फळांची खाणं


जडी बुडी औषधी मौल्यवान 

अशी वनस्पतीची थोरवी महान 


देते प्रेमाची शितल छाया 

थकलेल्या जीवाला तिचीच माया


लाखो जीवांचे वृक्षच हो घर 

जपवणूक करितो सुंदर 


जीवन जगण्याला त्याचीच साथ

भुकेला जीवाला देत असे हात


सर्व जीवाची भागवतात भुक 

आपल्या सुखात पहातात ते सुख 


वृक्ष तोडीला घाला आळा 

सगळेच मिळुन वृक्ष पाळा 


वृक्षच आपल्या जीवनाची पुजा 

ठेवु निष्ठा नको भाव दुजा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational