Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Samadhan Navale

Abstract Inspirational

3  

Samadhan Navale

Abstract Inspirational

जीवन

जीवन

1 min
242


अनुभवाचे असते जीवन

सुख दुःखाचे असते मिश्रण,

दुःख कधी,सुख कधी

आशा कधी,निराशा कधी,

अस्थिरता काय हेच जीवन ?

अनुभवाचे असते जीवन ||


खूप जगणे खूप खाणे,

काय हेच असते जीवन ?

की हसणे आणि हसवणे नि गाणे

जीवन म्हणजे एक तराणे,

जगावरती राज्य कराया...

गैर किंवा वैर होणे,

हवे कुणाला आहे मरण ?

अनुभवाचे असते जीवन ||


स्मृतीमध्ये असतात दडलेले

बहिष्कृत म्हणुन मागे सोडलेले,

हसलेले कुणी रडलेले

अज्ञान अंधारात पडलेले,

कसे जगतात, मरतात कसे

याचे कुणा भान नसे,

जीवन नसते हो करुण विवंचन !

अनुभवाचे असते जीवन

सुख दुःखाचे असते मिश्रण ||


Rate this content
Log in