STORYMIRROR

Prof. Dr.Sadhana Nikam

Fantasy Others

5.0  

Prof. Dr.Sadhana Nikam

Fantasy Others

जीवन ही एक कविता असते

जीवन ही एक कविता असते

1 min
14.9K


आयुष्याचं गुपित मांडते

जगण्याचा अर्थ सांगते

जीवन ही एक कविता असते


नात्याचे बंध ती जपते

माणुसकीची नाळ ती जोडते

जीवन ही एक कविता असते


जगावं कसं मरावं कसं

बेरीज वजाबाकी करून जाते

जीवन ही एक कविता असते


जेव्हा वजाबाकी बेरजेपेक्षा

अधिक होते

तेव्हा निराश न होता

जगावं कसं सांगणारी

जीवन ही एक कविता असते .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy