STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Abstract

4  

Shobha Sanjay Bavdhankar

Abstract

जीवन गीत

जीवन गीत

1 min
294

हिरव्यागार झाडीत दडलेली दिसली छोटी वाट काय वर्णावा तिचा थाट 

त्या वाटेवर होता फुलांचा सडा बघून जीव झाला वेडा 

ओंजळीत धराव्या वाटल्या फुलांच्या पाकळ्या

खळखळून हसतांना दिसत होता मोकळ्या 

नेत्रसुख हे क्षणिक वाटे 

चालतांना खसकन लागले काटे 

रुतलेला काटा काढायचा कसा,

घायाळ झाले मन काटा तर काढायला हवा होता पण 

मजबुत हातांची हवी होती साथ,

गरज होती पकडीची गरीबीने सगळ्यांची नजर होती वाकडी 

बालपण, तरूणपण कापरासारखे गेले उडुन

वाढत्या वयाची हाक आली दुरून 

भेडसावत आहे एकटेपणा,

नाही दोन शब्द वाटी

जगायचे हसत आपण आपल्यासाठी  

गातच रहावे जीवन हे मधूर

क्षणभर का होईना, जातो मृत्यूपासुन दुर ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract