जीन
जीन
1 min
366
ती सारं काही करत असते ,
एखाद्या ' जीन ' प्रमाणं
“ क्या हुक्म है , मेरे आका"
हे तिचे परवलीचे शब्द .
क्षणात तुमचं म्हणणं ऐकते ,
करते मागणी पुरी ,
सारं समजतं , सारं उपसते ,
जादू जशी खरी .
" जो हुक्म मेरे आका " म्हणून ,
मोठे मोठे दिव्य करते ,
किमयागार म्हणून ,
आयुष्यभर मिरवत असते .
साऱ्या जादू करणारी ती ,
जीनसारखीच विवश असते ;
एका बाटलीतून मात्र , स्वत : हून ,
ती , कधीच ना सुटू शकते .
कधीच ना सुटू शकते ! ...