झुक झुक गादी...!
झुक झुक गादी...!
झुक झुक गादी
झुक झुक गादी
आली आली
बगा दौलातं
कॅरम पिसांची
चाके फिलवतं
फिलवत चालते
मोत्त्या तोल्यातं
इंजिन त्याचे
आमलूतांजन बामं
काय इते मागद्या
खेलण्याचे कामं
येताच मी
गाली कलतो
बगा माझ्याच
लंगुनी नादातं
लवकल चला
पतपत बसा गालीतं
माया आहे ना
माझ्या बोबल्या बोलीतं..?
