STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Tragedy

3  

Sakharam Aachrekar

Tragedy

झंकार

झंकार

1 min
100

सुटते तुझी मिठी एका, अजाण वाटेवरती

तुझ्याविना मग मजसवे फिरती, आभास सावल्यांचे


सजवतो तुझ्या छबींनी, किरणांस त्या प्रभेच्या

दिवसासरती नेत्रांपुढे उरती, अंधार आसवांचे


गर्दीत तुझ्या आठवणींच्या, होती विलुप्त वाटा

प्रकाशशलाका दाविती मज मग, विमान काजव्यांचे


उंचावून ही नजर जराशी, शोधतो तुज मी क्षितिजावरती

अकारणच मज साद घालिती, आवाज तारकांचे


पथी जुन्या तुज पाहता मुखावर, हास्य नवे उमलून येते

तमात जाऊन रवी रोखतो, मीलन दोघांचे


दुःख कोऱ्या कागदाशी आता मांडतो मी थोडे

आठवतो तुझ्यासवेचे ते क्षण अमृताचे


रात्री माझे दुःख काहीसे, सांगतो रडून शशीस त्या

घन श्रावणी तुजवर बरसवतो, नीर माझ्या आसवांचे


एकदाच तू ही नगरात माझ्या, परतून ये जराशी

उमटतील तेथे पाषाणातूनही, झंकार मम प्रेमाचे


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন

Similar marathi poem from Tragedy