झालर
झालर
आप्तसौखिंसाठी जपतो किती नाती
अर्थ उरला नसला तरी संभाळतोच की सारी गोती
आतून किती तरी तुटतो जीव हा तरी
कोणाला कश्याची पर्वा असते
एक मनाशी जोडलेले नाते त्याला
असंख्य नात्यांची काटेरी झालर का असते
स्वतः साठी जरा जगायला येवडी प्रश्नांची उठाठेव का असते
काहूर माझतो मनात आणि दाटून कंठ कितीदा तरी येतो
मोकळे करण्या मनाला इथे तुझा स्पर्श कुठे असतो
पोसलेली नाती जगवताना स्वाभिमान गहाण पडतो आणि
स्वाभिमानाच्या चिंधडया उडताना उघड्या डोळ्यांनी पाहतो
पोसलेली नाती जगवावी की स्वाभिमान जगवावा की ठेवावे वडील धाऱ्यांच्या वयाचे भान
कोणाला जगवावे???
तुझ्यावर हक्क सांगून मोकळे करावे मनाला की तुला पण वाईट वाटते..
म्हणून नाटक करावे हसण्याचे पुन्हा एकदा
दाटून आलेल्या मनाला तुझ्या एक हाकेची गरज आहे
अश्रूंना मोकळे होण्याकरीता तुझ्या हाताची ओंजळ पुरेशी आहे
एक मनाशी जोडलेले नाते त्याला असंख्य काटेरी झालर का असते!
